पंतप्रधान सूर्य घर योजना:
नमस्कार वाचक मित्रांनो, आपल्या सर्वांना हे ठाऊकच आहे कि भारत सरकार वेळोवेळी नाविन्यपूर्ण योजनांचा प्रारंभ करत असते.यातच पंतप्रधान सूर्य घर योजनेची भर पडतांना दिसते. आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली १५ फेब्रुवारी २०२४ रोजी पंतप्रधान सूर्य घर योजनेचा आरंभ झाला.
पंतप्रधान सूर्य घर योजना काय आहे?
पंतप्रधान सूर्य घर योजनेच्या माध्यमातून देशात सौरऊर्जेला चालना मिळणार आहे.या योजनेच्या माध्यमातून लाभार्थी कुटुंबाच्या छतावर सोलर पॅनल बसवण्यासाठी 40%अनुदान देऊन 300 युनिटपर्यंत मोफत वीज दिली जाणार आहे.या योजनेमुळे नागरिकांना सर्वात मोठा फायदा म्हणजे विज बिल भरण्याची आवश्यकता राहणार नाही.या योजनेचा फक्त नागरिकांनाच फायदा नसून सरकारला सुद्धा फायदा होणार आहे.भारत सरकार हजारो कोटी वीज निर्मितीवर खर्च करतांना दिसतो.सूर्य घर योजनेच्या माध्येमातून त्या खर्चाला आळा बसणार आहे.वीज चोरीचे प्रकरण कमी होणार आहे.आणि लाभार्थी कुटुंबाला २४ तास वीज सेवा मिळेल.
पंतप्रधान सूर्य घर योजनेचे उद्दिष्ट :
तुम्हाला तर माहितीच आहे कि आज आपण घरात इलेक्ट्रोनिक वस्तूंचा वापर करतो त्यामुळे वीजबिल खूप येतांना दिसतेय.त्यामुळे सामान्य माणूस अनेक आर्थिक अडचणींना सामोरे जातांना दिसतो. पीएम सूर्य घर योजनेच्या माध्यमातून लोकांना त्यांच्या विजेची बचत करता येईल आणि सोलर सिस्टीमद्वारे वीज मिळेल. या योजनेच्या माध्यमातून केंद्र सरकारने देशातील 75000 कोटी रुपयांचे बजेट निश्चित केले आहे. या योजनेच्या माध्यमातून एक कोटी घरांना लाभ देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.या योजनेच्या माध्यमातून पर्यावरण रक्षणाबरोबरच ऊर्जा शक्तीला चालना मिळणार आहे.
पीएम सूर्य घर योजनासाठी पात्रता:
-
अर्जदार भारतीय नागरिक असणे आवश्यक आहे.
-
सौर पॅनेल बसवण्यासाठी योग्य छप्पर असलेले घर असणे आवश्यक आहे.
-
कुटुंबाकडे वैध वीज कनेक्शन असणे आवश्यक आहे.
-
तुमचे कौटुंबिक उत्पन्न 150,000 रुपयांपेक्षा जास्त नसावे.
-
तुमच्या कुटुंबातील कोणताही सदस्य सरकारी नोकरीत नसावा.
पीएम सूर्य घर योजनासाठी किती मिळणार सबसिडी ?
-
सौरयंत्रणेची एकूण किंमत = ₹४७०००
-
भारत सरकारद्वारे दिलेली सबसिडी =₹१८०००
म्हणून, जर तुम्हाला तुमच्या घरी 2 किलोवॅटची सोलर रूफटॉप यंत्रणा बसवायची असेल, तर तुम्हाला खालील रक्कम भरावी लागेल:
एकूण किंमत = ₹४७०००
-
सबसिडी = ₹१८०००
-
देय शिल्लक = ₹२९,०००
याचा अर्थ, तुम्हाला फक्त ₹२९,००० भरावे लागतील, ज्यामुळे तुम्हाला ₹१८,००० ची सबसिडी मिळेल. या सोलर रूफटॉप सिस्टीमद्वारे तुमच्या घराला वीज पुरवली जाईल आणि तुम्हाला वीजबिलापासून आयुष्यभरासाठी मुक्तता मिळेल.
अशा प्रकारे, तुमच्या घरी सौर रूफटॉप सिस्टीम बसवण्यासाठी तुम्हाला फक्त ₹२९,००० भरावे लागतील, तर उर्वरित रक्कम सरकारकडून अनुदान म्हणून दिली जाईल. ही सबसिडी सौर यंत्रणेच्या खर्चाच्या सुमारे 38% कव्हर करते.
पीएम सूर्य घर योजनासाठी लागणारे कागदपत्रे :
-
वीज बिल
-
आधार कार्ड
-
कायम पत्ता पुरावा
-
वार्षिक उत्पन्न प्रमाणपत्र
-
शिधापत्रिका
PM Surya Ghar Yojana 2024 Apply Online पीएम सूर्य घर योजना 2024 साठी ऑनलाइन अर्ज कसा करावा:
-
सर्वप्रथम, पीएम सूर्य घर मुफ्त बिजली योजनेच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या https://pmsuryaghar.gov.in
-
साइड होम पेजवर, पीएम सूर्य घर मुफ्त बिजली योजना 2024 ऑनलाइन अर्ज करा वर क्लिक करा.
-
आता अर्ज तुमच्यासमोर उघडेल. आवश्यक माहिती योग्यरित्या भरा.
-
फॉर्म भरल्यानंतर, सर्व आवश्यक कागदपत्रांची डिजिटल प्रत अपलोड करा.
-
सर्व माहिती आणि कागदपत्रे अपलोड केल्यानंतर सबमिट बटणावर क्लिक करा.
-
आता एकदा सबमिट केल्यावर, तुम्ही तुमच्या अर्जाची प्रिंटआउट घेऊ शकता.