Ladaki Bhahin Yojana 2024- मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना:
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्र सरकारची नवीन योजना असून ज्या योजने अंतर्गत स्त्रियांना दरमहा पंधराशे रुपये त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी देण्यात येणार आहे. या योजनेच्या माध्यमातून स्त्रियांना आर्थिक रित्या सक्षम होण्यास मदत होईल. असा महाराष्ट्र सरकारचा उद्देश असून ही योजना कायमस्वरूपी पुढे अमलात राहील असे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी आश्वासन दिले आहे. आज समाजात अनेक गरीब आणि गरजू स्त्रिया आहेत. त्यांच्यासाठी ही योजना खूप लाभदायक ठरेल असे श्री एकनाथ शिंदे आपल्या भाषणात बोलले. या योजनेच्या माध्यमातून स्त्रियांना आर्थिक रित्या चालना मिळेल हे महाराष्ट्र सरकारची धोरण असून लाभार्थांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे मुख्यमंत्र्यांकडून सांगण्यात आले आहे. या योजनेमुळे महिलांना दरमहा 1500 रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये राज्य सरकारकडून मिळणार आहे. आणि वर्षाकाठी 18 हजार रुपये.
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा दुसरा हप्ता लवकरच
लाडकी बहीण योजनेचा दुसरा हप्ता हा लवकरच जाहीर करण्यात येणार आहे मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनातून असे लक्षात आले आहे की सप्टेंबर अखेरीस लाडकी बहीण योजनेचा दुसरा हप्ता हा स्त्रियांच्या बँक अकाउंट वर पडणार आहे. अजून कोणी फॉर्म भरण्यास बाकी असेल तर त्यांनी लवकरात लवकर 31 ऑगस्ट पर्यंत फॉर्म भरावा.
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ हा कोणाला मिळणार:
-
माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्याच्या रहिवासी असणे आवश्यक आहे.
-
महाराष्ट्र राज्यातील विवाहित,विधवा, घटस्फोटित आणि निराधार महिला.
-
महिलाचे किमान व 21 वर्षे पूर्ण आणि जास्तीत जास्त वय 65 वर्षे पूर्ण होईपर्यंत.
-
माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या महिलेचे बँकेत खाते असणे आवश्यक आहे.
-
लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.50 लाखापेक्षा जास्त नसावे.
लाडकी बहीण योजनेसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे:
-
मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज.
-
लाभार्थी महिलेचे आधार कार्ड.
-
लाभार्थी महिलांच्या महाराष्ट्र राज्याचे रहिवासी प्रमाणपत्र, महाराष्ट्रातील जन्माच्या दाखला, राशन कार्ड, मतदान कार्ड .
-
सक्षम अधिकाऱ्याकडून दिलेल्या कुटुंबप्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला, राशन कार्ड.
-
बँकेच्या पासबुकच्या पहिल्या पानाची झेरॉक्स कॉपी.
-
फोटो KYC करीता.
-
राशन कार्ड .
-
लाडकी बहीण योजनेच्या अटी शर्थीचे पालन करण्याबद्दलचे हमीपत्र